
सिन्नर (प्रतिनिधी ) ३ डिसैंबर २०२५ जागतिक दिव्यांग दिन महामित्र परिवार यांच्या वतीने सिन्नर येथे साजरा करण्यात आला
यावेळी छत्रपती शिवरायच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की दिव्यांग व्यक्तींच्या उद्धारासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन दिव्यांगांच्या प्रती दया न दाखवता दिव्यांग व्यक्ती देखील सामान्य व्यक्ती प्रमाणे आपले जीवन सन्मानाने जगू शकतो, हा आत्मविश्वास देवून त्यांना संधी देणे आवश्यक आहे. शासन स्तरावर विविध उपक्रम योजना राबविण्यात येते. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे २०१६ मध्ये पारित झालेला दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम कायदा भारत सरकारने पारित केला आहे.
तसचे प्रमुख उपस्थित सिन्नर नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी अनिल जाधव सर यांनी दिव्यांग बांधवांना एकञ यऊ संघटित होण्यासाठी व आपले हक्क अधिकार मजबूत करण्यासाठी आव्हान केले. समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व खूप मोठे आहे, कारण ते व्यक्ती आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. शिक्षणामुळे व्यक्तींमध्ये ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढतो, ज्यामुळे त्यांना चांगले जीवन जगता येते आणि समाजात सन्माननीय स्थान मिळते. शिक्षणामुळे सामाजिक समानता वाढते, नैतिक मूल्यांची जाणीव होते आणि दिव्यांग बांधवना आपल्या हक्कांबाबत आणि कर्तव्यांबाबत जागरूक होण्यासाठी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन नंदुभा॓ऊ शिरसाठ यांनी केले.व प्रास्ताविक अरुण पाचोरे यांनी केले.तर आभार गणपत नाठे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे,प्रहार दिव्यांगना संघटना सिन्नर तालुका अध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे, जिल्हा संघदक गणपत नाठे, कार्याध्यक्ष नंदुभाऊ शिरसाठ संपर्कप्रमुख दौलत भाऊ ढोली,शहराध्यक्ष चंदुकाका पवार, उपाध्यक्ष आनंद सातभाई, बाळासाहेब आव्हाड ,रामनाथ लोणारे,दिगंबर शिरसाठ, अनिल भाटजिरे,प्रकाश भाटजिरे, रघुनाथ पावशेर,कविता खैरनार, सीताताई बाकले, रामनाथ भाऊ तांबे, चंद्रभांजी काकड नवनाथ कुऱ्हाडे इत्यादी प्रहार सेवक उपस्थित होत
