
नांदगाव (प्रतिनिधी ) स्व.शरद आण्णा जनता विद्यालय मांडवड या विद्यालयात ईयत्ता ५वी मध्ये शिक्षण घेत असलेले व मागील ७ ते ८ महिन्यापासून करूनेश्र्वर आश्रम जोंधळवाडी येथील महामंडलेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनात नवोदय विद्यालय अभ्यासक्रमाची तयारी करत असलेले मांडवड येथीलअत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थी
१) कु.वरुण रविंद्र आहेर. आणि
२) कु.करण भास्कर आहेर
या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय २०२५ या शैक्षणिक वर्षात सार्थ निवड झाली आहे.सदर विद्यार्थ्यांची निवड वोण्यासाठी स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती संजीवनी कांबळे व शिक्षक वर्ग यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले
