
नांदगाव (प्रतिनिधी) हनुमान जन्मोत्सव व श्रीराम नवमीच्या निमित्ताने नांदगाव तालुक्यातील गंगाधरी येथील मारुती मंदिरामध्ये 5 एप्रिल ते 12 एप्रिल 2025 पर्यंत (रौप्य महोत्सवी वर्ष) अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सप्ताहा मध्ये काकडा, भजन, ज्ञानेश्वरी पारायण ,हरिपाठ व हरिकीर्तन आधी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहात ह .भ. प. सीमाताई बेंडके, खिर्डीकर नंदू महाराज भालूरकर, वसंत महाराज डोमाडे, वाल्मीक महाराज गीते, आनंदा महाराज सोमठाणेकर, शनि भक्त सुखदेव महाराज वाकीकर, शिवाजी महाराज तळेकर ,संजय महाराज दुकळे, सागर महाराज शास्त्री भालेराव या नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे.



