
नासाका विद्यालयात महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना मुख्याध्यापक अरुण पगार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी.
नाशिकरोड:(प्रतिनिधी ) – पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या हस्ते आणि विद्यार्थी, शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वेदिका आडके, मानसी वाघचौरे, ईश्वरी आडके, धन्वंतरी गायधनी या विद्यार्थिनींनी भाषणातून महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अरुण पगार यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रतीक्षा शिरोळे हिने प्रास्ताविक केले. खुशी सानप हिने सूत्रसंचालन केले. शुचिता पिंपळे हिने आभार मानले.
