Homeताज्या घडामोडीवाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी
वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी
नाशिक ( प्रतिनिधी )दि एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत आज शुक्रवार दि.२८/११/२०२५ रोजी स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शाळेचे उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर यांनी अध्यक्षीय मनोगतातून क्रांतिसूर्य महात्मा फुले त्यांचे कार्य,स्त्री आणि त्यांच्या शिक्षणाचे महत्त्व सांगून *"अन्यायाशी असा झुंजला,बघा ज्योतिबा माझा"* हे सुंदर गीत सरांनी यावेळी सादर केले.तसेच चांगले भाषण व सुत्रसंचलन करणा-या विद्यार्थिनींचे शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आले.श्री विजय सरोदे सरांनी महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली.सौ.मिनाक्षी दोंड मॅडम यांनी दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या गोष्टीतून महात्मा फुले त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले.तसेच इ.६वी,७वी,८वीच्या विद्यार्थिनींनी महात्मा फुले यांच्या कार्याची व कविता सादर करत स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले हे महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित सुंदर गाणे सादर केले.कु.अदविका शिरसाठ ६-अ हिने इंग्रजी भाषेतून सुंदर असे विचार व्यक्त केले.त्यांना मार्गदर्शन सौ.अर्चना गायकवाड मॅडम यांनी केले.यावेळी शालेय परिसरात ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते.सुत्रसंचालन कु.मनस्वी चिंचोले ७-अ यांनी तर आभारप्रदर्शन कु.रिया चाबुकस्वार ७-अ हिने केले.फलकलेखन सौ.सायली मुळे मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम,अधिक्षिका मा.सौ.मीना वाळूंजे मॅडम,उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मा.श्री मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मॅडम,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे मॅडम,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींनी उपस्थित होते.