
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०९७ वा दिवस
वस्तू जितकी जास्त जवळ, तितकीच तिची जाणीव आपल्याला कमी होते. आत्मा हा अधिकाधिक जवळ आहे, त्यामुळेच असंयत, चंचल चित्ताच्या व्यक्तीला याचा सुगावाही लागत नाही. पण मन वशीभूत असलेला शांत जितेंद्रिय आणि विवेकशील मनुष्य बाह्य जगताची उपेक्षा करून अंतर्जगात प्रवेश करतो व कालांतराने या आत्म्याच्या महिम्याची उपलब्धी करून घेतो. अखेर महान होतो. तेव्हाच त्याला आत्मज्ञान लाभते व मीच तो आत्मा आहे 'तत्वमसि श्वेतकेतो' वगैरे वैदिक महाकाव्यांची त्याला प्रत्यक्ष अनुभूती होते.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १ मार्गशीर्ष शके १९४७
★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २२ नोव्हेंबर २०२५
★ १८८५ पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्मदिन
★ १९०९ स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, नाशिकच्या दैनिक ‘गावकरीचे’ संस्थापक दत्तात्रेय शंकर ऊर्फ दादासाहेब पोतनीस यांचा जन्मदिन
★ १९१३ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे राजदूत डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्मदिन
★ २००२ मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे नेते गोविंदभाई श्रॉफ यांचा स्मृतीदिन.
