
अभिमान संस्थेचा….!
अभिमान शाळेचा…..!

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षा आतील शालेय खो-खो स्पर्धेत यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नाशिक या शाळेच्या संघाने महाराष्ट्राचे उपविजेतेपद पटकावले.खो-खो संघाची कर्णधार ताई पवार, सुषमा चौधरी, व कौसल्या कहांडोळे यांची जबलपुर (मध्यप्रदेश ) येथे संपन्न होण-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संघाचे कौतुक व अभिनंदन करताना संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाशजी वैशंपायन, संस्थेचे सेक्रेटरी मा.हेमंत बरकले ,ग.कौ.सदस्य तथा सरस्वती विद्यालयाचे चेअरमन मा.रविंद्र कदम, संस्थेचे कार्यालयीन प्रमुख मा.एस.के.जाधव , शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे, अधिक्षिका मा.सौ.मिना वाळुंजे, उपमुख्याध्यापक मा.राजेंद्र सोमवंशी ,ग.कौ.सदस्य मा.के.डी.बागुल, पर्यवेक्षिका मा.सौ.सुषमा गवारे आदि….

