
ओझर: ( वार्ताहर) मविप्र संचलित ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयाने के आर टी हायस्कूल मौजे सुकेणे ता निफाड येथे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लघु नाटिका व समूह लोकगीतात अनुष्का मोरे श्रावणी मोरे व इतर विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावला. मविप्र संस्थेचे उपसभापती डी बी मोगल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. आज पर्यंत बोरस्ते विद्यालय सांस्कृतिक व इतर कार्यक्रमात अव्वल राहिलेले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना संगीत शिक्षिका शितल आहेर मोनाली निकम शितल हांडोरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सुभाष केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
