
मनमाड (प्रतिनिधी):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मनमाड येथील आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये थोर भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवाद आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापिका शितल आहेर होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते सी वी रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शिक्षिका संपदा येणारे यांनी विद्यार्थ्यांना सी वी रमण यांच्याबाबत माहिती दिली रमण यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888मद्रास येथील तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांनी पारदर्शक पदार्थातून एक वर्णी प्रकाशाची प्रखर किरणे गेले तर काय घडेल याविषयी संशोधन केले. निळ्या रंगावर संशोधन करून प्रकाशाचे विकिरण यावर कार्य केले व आकाश निळे का दिसते याचे शास्त्रीय स्पष्टीकरण दिले.मुख्याध्यापिका शितल आहेर यांनी विद्यार्थ्यांना सूर्यमालेबाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांना उद्याचे भावी शास्त्रज्ञ होणार यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
