
मनमाड (प्रतिनिधी) मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आ.सुहास कांदे यांच्या गटाचे माजी आमदार संजय पवार यांची बिनविरोध सभापती पदी निवड झाली.
आ. सुहास कांदे यांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली माजी आ. संजय पवार यांची निवड सार्थ ठरली या निकाला विरोधात दिपक गोगड यांनी न्यायालयात दाद मागितली होती. परंतु त्यांच्याच विरोधात निकाल लागला त्यामुळे संजय पवार यांचा सभापती पदाचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या या निवडीमुळे आ. सुहास कांदे गटाचे वर्चस्व सिद्ध झाले. या निकालामुळे पुढील निवडणुकीत आ. सुहास कांदे यांच्या गटाला चांगलाच फायदा होईल. आ. संजय पवार यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संजय पवार यांची मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी निवड झाली त्याबद्दल अभिनंदन करतांना आमदार सुहास अण्णा कांदे व इतर
