
नांदगाव (प्रतिनिधी ) विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संघ शताब्दी निमित्ताने सप्तशक्ती संगम महिला- माता मेळावा दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुवार व्ही.जे.हायस्कूल, नांदगाव येथे गुरुदक्षिणा सभागृहात उत्साहात पार पडला. महिलांच्या क्षमतेला अधोरेखित करत त्याच्या विकासासाठी भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षा नांदगाव मधील प्रतिष्ठित उद्योजिका मा.सौ. अलकाताई धामणे लाभल्या. विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲकॅडमीक बोर्ड सदस्या व प्रमुख व्याख्यात्या सौ. रुपाली झोडगेकर, प्रमुख वक्त्या श्रीमती. विद्या महाले उपस्थित होते.
सर्व माता- पालकांचे औक्षण करून सभागृहांत स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शारदा थोरात यांनी करत कार्यक्रमाच्या उद्दिष्टावर प्रकाश टाकला व मातृशक्ती ची बलस्थाने सांगितली. विद्यालयाचे मुख्यध्यापक मा.श्री. लक्ष्मीकांत ठाकरे यांनी सप्तशक्ती संगम हा स्त्री- सक्षमीकरणावर आधारित उपक्रम असून स्त्रीशक्तीच्या जागृतीचे आणि प्रगतीचे प्रतिक आहे असे सांगितले
गीतमंचाच्या विद्यार्थिनीनी ‘नव युग का नवा विचार ‘ , हम हैं मातृशक्ती या सुमधुर गीतानी उत्साहपूर्ण वातावरण निर्मिती केली. श्रीमती. सुनिता देवरे यांनी गीतमंचच्या गीताची मुली कडून तयारी करून घेतली यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, शारदा माता. ओम् प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दिपप्रज्वलन सरस्वती वंदना म्हणून कार्यक्रमांचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीचा परिचय सौ. रेश्मा पवार यांनी करून दिला. प्रमुख व्याख्यात्या सौ. रुपाली झोडगेकर यांनी ‘ कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरणाबाबत भारतीय दृष्टिकोन ‘ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याच्या विकासप्रक्रियेत माताचे योगदान मोलाचे आहे यांची जाणीव अधिक स्पष्ट करून दिली. जबाबदार पालकत्व, बालकांचा भावनिक विकास, कुटुंबातील संवाद , परस्पर सांमजस्य, संस्कार महिलाची आपले कुटुंब घडविण्यातील भूमिका विशद केली. राष्ट्रनिर्माण व पर्यावरण विषयी जागरूक राहून पर्यावरण संवर्धनचे महत्व पटवून दिले.
इ. ७वीच्या काही निवडक विद्यार्थिनीनी कतृर्त्ववान महिलांची वेशभूषा करून स्वागत सादर केले. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत सन्मानाने कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या विशेष मातांचा विद्याभारतीच्या वतीने पारितोषिक ,शाल, पुस्तक, गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. यांत ग.भा. सुमनताई काकळीज (वाखारी), सौ. शोभाबाई मान (जाटपाडे), सौ. मीना जाधव (नांदगाव) या महिलांचा गौरव करण्यात आला
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती. विद्या महाले यांनी ‘भारताच्या विकासात आधुनिक महिलाची भूमिका ‘ याविषयी प्रेरणादायी संवाद साधला. भगवदगीतेत १०व्या अध्यायातील ३४ व्या श्लोकांत महिलाच्या सप्तशक्ती विषयी सांगितले आहे किर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, श्रृती, क्षमा हे गुण महिलामध्ये जन्मजात आहे म्हणूनच समाज उभारण्यात त्या आघाडीवर आहे याविषयीचे विचार मांडले डिजिटल युगातली पालकांची भूमिका याविषयीचे महत्व पटवून सांगितले
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.सौ. अलकाताई धामणे यांनी सांगितले की माता पालकांच्या उत्स्फूर्ते सहभाग कार्यक्रमास आहे महिलांनी सात्विक गुणांनी प्रेरित होऊन स्वतःला व समाजाला प्रेरीत करावे. आजच्या युगात महिलांनी आत्मनिर्भर होण्याची गरज आहे असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले. महिलासाठी प्रश्नमंजूषा घेऊन बक्षीस पुस्तक वाटप करण्यात आले याचे नियोजन संयोजिका श्रीम. प्राजक्ता आहेर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार श्रीमती. निवेदिता सांगळे यांनी केले
कार्यक्रमासाठी मार्गदर्शन शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री. संजीवभाऊ धामणे शाळेचे मा. मुख्यध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे, उपमुख्यध्यापक मा. डॉ.श्री.जोगेश्वर नांदुरकर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमास माता पालक संघ व पालक शिक्षक संघ अध्यक्षा सौ. पुनम लोहाडे ,व मिनिषा ताई ठोंबरे या उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी याचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण कार्यक्रमाची प्रमुख म्हणून श्रीमती प्राजक्ता आहेर मॅडम व सौ रूपाली झोडगेकर यांनी काम बघितले. या कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती देवरे मॅडम यांनी व सर्व महिलांनी प्रतिज्ञा घेऊन केला. कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
