
खासदार राजाभाऊ वाजे यांची आहुर्ली उपोषणास भेट व पाठींबा,,,,
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन
ईगतपुरी तालुका राज्याच्या विकासासाठी योगदान देणारा तालुका म्हणुन ओळखला जातो. पण विकास, विकास व विकासाच्या नावाखाली या तालुक्यावर किती प्रकल्प लादता ? किती कुटुंबे देशोधडीला लावता ? उध्वस्त करता असा सवाल करत ईगतपुरी तालुका नकाशावर तरी ठेवता की नाही असा संतप्त सवाल ऱस्ते प्रकल्प बाधित शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांचेसह बाधित शेतकरी बांधवानी शासन व प्रशासनाला केला आहे.
आहुर्ली ता.ईगतपुरी येथे या प्रकल्प बाधित शेतकर्याचें साखळी उपोषण सुरु असुन आज त्या आंदोलनाचा नववा दिवस सुरु आहे.

ईगतपुरी तालुका हा प्रकल्पाचां तालुका म्हणुन ओळखला जातो आहे.थंड हवेचे ठिरकाण, पावसाचे माहेरघर व भाताचे आगर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या या तालुक्यावर शासन, प्रशासनाची सातत्याने वक्रदृष्टी असुन असंख्य प्रकल्प या तालुक्यात करुन लाखो हेक्टर जमिनी संपादित झालेल्या आहेत. या प्रकल्पामुळे अनेक गावे उठली आहेत.हजारो कुटुंबे देशोधडीला लागली आहेत.
ही वस्तुस्थिती असतानां आता किमान राहिलेल्यानां सुखाने जगु दयावी ही अपेक्षा आहे.मात्र दुर्देवानेही ती ही फोल ठरत असुन विकासाचे नावाखाली विविध प्रकल्प ईगतपुरी तालुक्यातील शेतकर्याचें बोकांडी मारले जात असल्याचे दिसते आहे.

यापुर्वी तालुक्यात लहान मोठी अशी तेरा धरणे, दोन औदयौगीक वसाहती, लष्कर, वनविभाग, रेल्वे ,राष्ट्रीय महामार्गासाठी या पुर्वीच लाखो हेक्टर सुपिक जमिनी संपादित केलेल्या असुन हजारो शेतकरी उध्वस्त झालेला नाही.
आता पुन्हा नव्याने घोटी ते त्रंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी ला जोडणारा वाढवण बंदराशी निगडीत महामार्ग, पारदेवी, आडवण नियोजीत औदयौगीक वसाहत, नव्याने रेल्वे मार्ग आदी प्रकल्प नियोजीत असुन त्या दिशेने सरकारी पातळीवर द्रुतगतीने हालचाली सुरु झालेल्या आहेत. या शिवाय आगामी सिंहस्थ कुंभमेळयाचे पाश्वर्भुमी वर रस्तेसह विविध बाबीसाठी ही जमिनी संपादन प्रक्रियेस वेग आल्याचे दिसुन येते आहे.
मात्र यात शेकडो कुटुंबे उध्वस्त होऊन रस्त्यावर येणार असल्याने या नियोजीत प्रकल्पानां शेतकरी कडाडुन विरोध करत आहेत.
दरम्यान आहुर्ली येथे साखळी उपोषण सुरु असुन राज्याचे शिक्षणमंत्री ना.दादा भुसे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी सभापती निवृत्ती जाधव, माजी पं.स.सभापती पांडुरंग मामा वारुंगसे, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब गाढवे, अँड. रतन इचम आदीनीं आंदोलन स्थळाला भेट देत पाठिंबा व्यक्त केला आहे.
यावेळी कृती समिती चे अध्यक्ष नागेश गायकर सचिव गोरक वाजे, उपाध्यक्ष सपन परदेशीं, विवेक कुटके उमेश खातळे, भास्कर पाचरणे अँड.हनुमान मराडे, महादू गायकर,नथू कुटके रमेश धांडे रामचंद्र गायकर संतू गायकर रामदास जमदडे, श्याम गायक, शरद खकाळे, विठ्ठल खकाळे, दिलीप मेदाडे दत्तू गायकर,द्यानेश्वर गटकळ,ज्ञानेश्वर जमदडे, शिवाजी गायकर, मधू गायकर, कचरू पिंगळे,श्याम जाधव आदीसह अनेक बाधित शेतकरी हजर होते.
महायुतीचे सरकार शेतकर्याच्यां पाठिशी- ना.दादा भुसे
महायुतीचे सरकार हे शेतकरी व कष्टकरी यांचे सरकार आहे. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी हे सरकार घेईल.
तुमचा विकास होतो,पण आमचा जीव जातोय- अँड.अरुण पोरजे
विकासाला आमचा विरोध नाही.पण विकासाचे नावावर सतत आमचाच बळी का ? अजुन किती अन्याय करणार आहात ?
न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहिल- नागेश गायकर
नियोजीत महामार्गात सुपिक शेतजमिनी व कष्टाने बांधलेली घरे उध्वस्त होणार आहेत. लोकशाहीप्रधान देशात लोकांवर हा अन्याय का ? न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहिल.
-नागेश गायकर
कृती समिती अध्यक्ष
