
समर्थ जेष्ठ नागरिक संघटना, प्रमोदनगर, गंगापूर रोड नाशिक यांचे कार्यालयात जेष्ठ नागरिकांचा सामुहिक वाढदिवसाच्या निमित्ताने कवी श्री.वाळू आहेर यांचे कविता वाचन झाले.आपले अनुभव कथन करून शेतकरी, नातलग, सामाजिक विषमता, नागरिकांच्या समस्या या विषयावरील विनोदी कविता सादर केल्या.

जीवनात आपण भोगलेला त्रास समाजात वावरताना इतरांना होऊ नये यासाठी कार्यरत राहावे असा विचार मांडला.सुरूवातीला जेष्ठ नागरिकांचा वाढदिवसाच्या निमित्ताने शाल आणि गुलाब देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी श्री.कुलकर्णी यांनी केले.अध्यक्ष श्री.सावंतसर यांनी श्री वाळू आहेर यांचा परिचय करून दिला आणि शाल देऊन सत्कार केला

.कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री.तुकाराम आहेर,नाना बोरस्ते, चिंतामणी,दाणी, म्हस्के,शर्माजी आणि महिला सभासदांसह१००जण कार्यक्रमास उपस्थित होते.पसायदान होऊन कार्यक्रम संपन्न झाला.

