
पंडित धुप्पे
ग्रामीण प्रतिनिधी माहूर
माहूर तालुक्यातील वानोळा येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक असलेले दिलीप संतराम राठोड यांना सेवापुर्ती निमित्य विद्यालयाच्या वतीने निरोप समारंभ व सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाचुंदा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशीराम पाटील पवार हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार राठोड, माजी चेअरमन संतराम राठोड, यमसिंग चव्हाण,भाजपचे धरमसिंग राठोड, माजी जि प सदस्य संजय राठोड, माजी प्राचार्य संजय शिवरामवार, डॉ. बुरशे,डॉ. कपिल चव्हाण, डॉ. पंकज राठोड, डॉ. संजीवनी चव्हाण, शिक्षक नामदेव राठोड, अरविंद जाधव, माजी उपसरपंच सुरेश राठोड, गोविंद चव्हाण,सुदाम चव्हाण, चंदू चव्हाण, पत्रकार पंडित धुप्पे,प्रकाश पाटील, संतोष राठोड, वासुदेव राठोड, अजय चव्हाण, मुख्याध्यापक वरके, शिक्षक शिंदे,विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य किशोर राठोड,शिक्षक,गावकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरस्वतीच्या प्रतिमेचे व शिक्षण महर्षी दतराम राठोड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रस्ताविक मध्ये विद्यालयाचे प्राचार्य किशोर राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. निरोप समारंभाचे सत्कारमूर्ती दिलीप राठोड व त्यांची पत्नी प्रणिता राठोड यांचे मान्यवराच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. मान्यवरांची मनोगत भाषणे झाली. यावेळी सत्कारमूर्ती दिलीप राठोड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि.टी राठोड यांनी केले.कार्यक्रमाला शिक्षक विजय राठोड, कुमरे, मुनेश्वर,लाखकर, किशोर राठोड, मुनेश्वर, विशाल राठोड या शिक्षकानी परिश्रम घेतले.
