
सिन्नर (प्रतिनिधी )नाशिक च्या मालेगाव तालुक्यातील डोगराळे गावातील एका लहान साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर एका विकृत नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली.या घटनेच्या निषेधार्थ सिन्नर येथे महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड,ट्रायबल आर्मी यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.व नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील भयानक कृत्य घटना विकृत मानसिकतेने एका लहान साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी महामित्र दत्ता वायचळे यांनी केली. महाराष्ट्रातील दुर्दैव अशी घटना नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून केला या चिमुकलीवर अन्याय, अत्याचार झाला आहे. प्रशासनाला, सरकारला विनंती आहे की, काहीतरी करा. आता न्याय हवाय!” नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सिन्नर करानी केली आहे.
या निवेदनाची प्रत मा.तहसिलदार व पोलीस निरीक्षक सिन्नर यांना देण्यात आली

याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,ट्रायबल आर्मी चे अध्यक्ष अमोल गवारी,राजाभाऊ चव्हाण,सिंधुताई जडगुले, नंदकुमार मुत्रक दशरथ रोडे,सागर उगले,शाम डांगे किरण मुठे आदि.उपस्थित होते
