
सिन्नर ( प्रतिनिधी )२० नोव्हेंबर २०२५ प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या ५२ वा स्मृतिदिन महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की केशव सीताराम ठाकरे, ज्यांना प्रबोधनकार ठाकरे या नावाने ओळखले जाते, मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते आणि लेखक होते.त्यांनी अंधश्रद्धा, बालविवाह, अस्पृश्यता आणि हुंडा यांसारख्या सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुरस्कर्ते होते आणि शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांचे वडील होते. कार्य आणि योगदान
समाजसुधारक: त्यांनी महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव स्वीकारून ब्राह्मणेतर चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. अस्पृश्यता निवारण आणि हुंडाविरोधासाठी त्यांनी आपली लेखणी आणि वाणीचा उपयोग केला.पत्रकार आणि लेखक: ‘प्रबोधन’ या मासिकाचे त्यांनी संपादन केले. त्यांनी ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ यांसारख्या अनेक पुस्तकांची रचना केली, ज्यात त्यांनी धर्म आणि समाज यातील संबंधांवर प्रकाश टाकला.प्रभावी वक्ते म्हणून ओळखले जात होते आणि त्यांनी अनेक व्याख्याने दिली.त्यांनी इतिहाससंशोधनही केले, त्यांनी इतरही अनेक उद्योग केले, जसे की टंकलेखन, फोटोग्राफी, तैलचित्रकला आणि नाट्यव्यवसाय.तसेच महात्मा फुले, हे त्यांचे प्रेरणास्रोत होते.अशा महान विचारवंत प्रबोधनकार केशव ठाकरे यांचा कार्याला विनम्र अभिवादन

या कार्यक्रमाचे सुञसंचलन भीमसेन साळवे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार अमोल गवारी यांनी मानले
या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे ट्रायबल आर्मी अध्यक्ष अमोल गवारी,सुनिल सावंत,संदिप मुठे,योगेश मिश्रा पियुष उपाध्याय, मनोज गवारे कुणाल वरंदळ, रोहित मुठे, किरण मुठे शाम डांगे आदि.उपस्थित होते
