
नांदगाव (प्रतिनिधी ) आज वार गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव या केंद्र शाळेत म. वि.प्र. तालुकास्तरीय सांस्कृतिक महोत्सव 2025-26 प्राथमिक विभागासाठी समूह नृत्य तर उच्च माध्यमिक विभागासाठी समूह नृत्य व नाट्य सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

तालुका संचालक माननीय अमित भाऊ बोरसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षस्थानी माननीय राजाराम गवांदे तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय काकळीज सर माननीय राजेश पाटील हे होते यात नांदगाव तालुका व येवला तालुका येथील प्राथमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमा चे सूत्रसंचालन श्री प्रदीप शिरसाट व श्रीमती निशिगंधा कदम यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे कार्य शाळेचे मुख्याध्यापक माननीय अविनाश साळुंखे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक म्हणून श्रीयुत हेमंत संगमनेरे, श्री बोराडे व श्री प्रथमेश घुगे यांनी एकदम नि:पक्षपातीपणे निकाल दिला

.यात प्राथमिक विभागात होराजन नांदगाव यांचा प्रथम, अभिनव बाल विकास मंदिर भालूर यांच्या द्वितीय व आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव यांच्या तृतीय क्रमांक आला तसेच उच्च व माध्यमिक विभागात कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नांदगाव यांचा प्रथम क्रमांक आला . हा कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

