
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०९५ वा दिवस
हे विश्व स्वतःची रहस्ये आम्हाला उघडी करून दाखवायला तयार आहे, स्वतःच्या रहस्याची द्वारे आमच्यासमोर उघडायला राजी आहे; मात्र त्यासाठी ते दार कसे ठोठवायाचे, त्यावर आवश्यक तेवढा धक्का कसा मारायचा, हे आम्हाला अवगत असले पाहिजे. तो धक्का देण्याला आवश्यक असलेली शक्ती आणि जोर एकाग्रतेतूनच निर्माण होत असतो. मानवी मनाच्या शक्तीला काही सीमा नाही. ते जितके अधिक एकाग्र होईल, तितकी एखाद्या गोष्टीवर केंद्रित होण्याची त्याची शक्ती वाढेल. हेच या बाबतीतील रहस्य होय.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २९ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक अमावस्या
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २० नोव्हेंबर २०२५
★ १९२७ सुप्रसिध्द कायदेपंडित लेखक मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्मदिन.
★ १९७३ समाजसुधारक, पत्रकार, लेखक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचा स्मृतिदिन
★ बालक हक्क दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
