
सिन्नर ( प्रतिनिधी )चांडक कन्या विद्यालय ही सिन्नर तालुक्यातील नावाजलेली मुलींची एकमेव शाळा आहे.उपक्रमशील शाळा म्हणून समाजामध्ये ओळखल्या जाणाऱ्या शाळेत खास महिलांसाठी महिला सप्तशक्ती संगम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान पश्चिम महाराष्ट्र प्रांत,तथा नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३०वाजता हा सोहळा चांडक कन्या विद्यालयाच्या सभागृहात पार पडणार आहे.
संयुक्त कुटुंब सांभाळणाऱ्या,सामाजिक व पर्यावरणाचे विशेष संवर्धन करणाऱ्या महिलांचा सन्मान मेळाव्यात करण्यात येणार आहे.कुटुंब प्रबोधन व पर्यावरणा बाबत भारतीय दृष्टिकोन
आणि भारताच्या विकासात महिलांची भूमिका या विषयावर समाजसेविका गीताताई कुलकर्णी व माधवी पंडित यांच्या संस्कारक्षम व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या मेळाव्यास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले यांनी केले आहे.
