
नांदगाव – मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन नियोजित अध्यक्ष मा. इंजि. अमित भाऊ बोरसे- पाटील ( तालुका संचालक मविप्र नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
याप्रसंगी माता सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, नटराज यांचे प्रतिमेचे तसेच रंगमचाचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम प्रास्ताविक मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मा इंजि अमित भाऊ बोरसे- पाटील यांनी आजचा हा उत्सव विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला म्हणून आयोजन केले जाते. मविप्र संस्था नेहमीच विद्यार्थ्यांना याकरिता मंच उपलब्ध करून देत असते. यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. याप्रसंगी विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
साऊंड सिस्टीम चे नियोजन सुनील सुपेकर, योगेश खालकर, गजेंद्र माताडे यांनी केले.

याप्रसंगी रमेश अण्णा बोरसे, विजय काकळीज, राजाराम गवांदे, राजेश पाटील, अशोक जाधव, बाळासाहेब कदम, बाळकृष्ण बिन्नर, अविनाश सोळंके, जाधव सर,शरद थेटे, दिपक चव्हाण, अविनाश शेवाळे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता केदारे व कल्पना आहिरे यांनी केले.
