
सिन्नर प्रतिनिधी( सोमनाथ गिरी ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वीर भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस राष्ट्रीय जनजाती गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी विद्यालयालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले होते.व्यासपीठावर पर्यवेक्षिका जयश्री पगारे ,सीमा गोसावी, रेखा खंडीझोड, कचेश्वर शिंदेउपस्थित होते

उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आदिवासी गीताचे देखील सादरीकरण करण्यात आले यात सायली आव्हाड,शितल वारुंगसे ,कावेरी शेलार,खुशी वाघ,कावेरी काळुंगे,प्रगती वाजे,अक्षदा सांगळे,तन्वी वाजे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तसेच निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य उगले म्हणाले भगवान बिरसा मुंडा हे भारतीय आदिवासी समाजातील सर्वात तेजस्वी प्रेरणादायी आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणून ओळखले जातात.ब्रिटिश सत्ते विरोधात आदिवासींचा आवाज त्यांनी बुलंद केला .त्यांच्या जन्मदिवशी भारतात राष्ट्रीय जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो हेच त्यांच्या कार्याची मोठी साक्ष आहे.भगवान बिरसा मुंडा आदिवासींसाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे.त्यामुळे आजही लोकांच्या हृदयात अजरामर आहेत म्हणूनच इतिहासात त्यांचे स्थान सदैव उज्ज्वल राहील.आरोही जाधव ,आराध्या वाजे,स्नेहा शिंदे यांनी मुंडा यांच्या जीवन व कार्याविषयी माहिती दिली.विद्यार्थिनींना सांस्कृतिक प्रमुख सुनिल ससाणे, जयश्री गोहाड व मारुती डगळेयांचे मार्गदर्शन लाभले.
सूत्रसंचालन कुमारी गौरी वाजे हिने केले आभार सोमनाथ गिरी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक समितीने विशेष मेहनत घेतली.
