
लासलगाव, दि. 19 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर च्या वतीने देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची १०८वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी त्यांची जयंती ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ म्हणून साजरी करण्यात येते. उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर व प्रा.देवेंद्र भांडे यांच्यासह उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. इंदिरा गांधी यांची जयंती ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ म्हणून पाळण्यात येते. यानिमित्त पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जीवनातील विविध प्रसंगाची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती प्रेरित केली. यावेळी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर यांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर व प्रा. देवेंद्र भांडे आणि रा.से.यो. स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
