
लासलगाव, दि. १८ नोव्हेंबर (प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर च्या वतीने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. तरुण पिढीला व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देत, आरोग्यदायी आणि सुव्यवस्थित समाज निर्मितीचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार यांनी सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.
यावेळी उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापकांसह रा.से.यो. स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर व प्रा.देवेंद्र भांडे आणि रा.से.यो. स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
