
नांदगाव ( प्रतिनिधी ) मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षीय कु यज्ञा जगदीश दुसाने या चिमुकली वर अमानुष अत्याचार करुन जीवे मारल्याच्या निषेधार्थ नांदगाव येथील सर्व सुवर्णकार बांधव यांनी निषेधार्थ फलक घेत एकत्र येत नांदगाव पोलीस निरीक्षक श्री भदाणे यांना त्या नराधमास फाशीची शिक्षा मिळावी या मागणीचे निवेदन देत मागणी केली सदर घटना ही सर्व समाजातील घटकांसाठी अत्यंत निंदनीय आणि घ्रुणास्पद असुन असे परत घडु नये यासाठी पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी व शासनाने या नराधमासाठी कठोराकठोर कायदा कराव ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली
या वेळी नांदगाव सुवर्णकार समाजातील श्री वामनदादा पोतदार, नरेंद्र खरोटे, शाम दुसाने, आण्णा दाभाडे, खंडुशेट दंडगव्हाळ, शंकर विसपुते, सचिन खरोटे, विजय पोतदार, जितेंद्र चव्हाण, मनिष बाविस्कर, शशिकांत भालेराव, पत्रकार चंद्रकांत भालेराव गोलु सोनवणे, अमित खरोटे, प्रसाद वडनेरे, चेतन विसपुते, आदी समाज बांधव उपस्थित होते तर मोठ्या प्रमाणात समाजातील तरुणांचा सहभाग होता
