
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०९४ वा दिवस
स्वतःचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे ही तुमची प्राथमिकता असली पाहिजे. तुमचे जीवन सुंदर, समृद्ध, सफल व सार्थक व्हावे. मानवतावादी विचारांसाठी तुम्ही सतत प्रयत्न करावा ही तुमची अतःप्रेरणा असावी. आज या घटकेपासून तुम्ही निर्धार करा, स्वतःला कमकुवत विचारांपासून सतत दूर ठेवाल आणि मनात समृध्द व सकारात्मक विचार सतत तेवत ठेवाल. यामुळे तुम्हाला सुख, शांती, समृद्धि मिळेल, पर्यायाने, तुमची इच्छित फलप्राप्ती होईल. कितीतरी लोक धनाने श्रीमंत असतात; पण विचाराने दरिद्री असतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २८ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १९ नोव्हेंबर २०२५
★ १८२८ झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्मदिन
★ १९१४ त्रिसागराने वेष्टीत कन्याकुमारी स्थित विवेकानंद शिलास्मारकाचे निर्माण कार्य “एक जीवन एक ध्येय” मानून पूर्णत्वास नेणारे तथा विवेकानंद केंद्राचे संस्थापक मा. एकनाथजी रानडे यांचा जन्मदिन तथा “साधना दिवस “
★ १९१७ स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, पोलादी महिला (आर्यन लेडी) भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्मदिन.
★ राष्ट्रीय एकात्मता दिन.
★ जागतिक महिला उद्योजकता दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
