
नुतन जिल्हाध्यक्ष जिभाऊ बच्छाव यांचा सत्कार करतांना राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर,काळूजी बोरसे,उदय शिंदे,राजेश सावंत मोठाभाऊ हिरे आदी पदाधिकरी.

जिल्हाध्यक्षपदी : जिभाऊ बच्छाव यांची निवड
मनमाड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची जिल्हा स्तरीय सहविचार सभा नुकतीच रॉयल हेरिटेज हॉटेल, नाशिक येथे मा. काळूजी बोरसे पाटील (माजी राज्याध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्य नेते उदय जी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर उपाध्यक्ष राजेश सावंत, आनंदा कांदळकर, मा.राज्यपदाधिकारी केदु देशमाने, दादाजी सावंत , सुनिल भामरे, प्रकाश सोनवणे, बुद्धेसिंग ठोके,प्रकाश अहिरे, साहेबराव पवार, व्यासपीठावर होते. यावेळी उपस्थित मान्यवरांसह सभागृहाने जिभाऊ बच्छाव (मालेगाव) यांची जिल्हाध्यक्षपदी तर प्रकाश आहिरे यांची जिल्हा नेतेपदी निवड केली. मान्यवरांच्या व उपस्थितांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शाखा कटिबद्ध असून संघटना वाढीसाठी
सर्वांनी झोकून देउन काम करण्याचे आवाहन राज्यपदाधिकार्यांनी आपल्या मनोगतातून केले.
प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सूरू असलेली कार्यवाही तसेच टीईटी बाबतचा फेरविचार होवून केंद्र सरकारने कायदेशीर मार्ग काढावा यासाठी देशव्यापी मोर्चात सहभागी होण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन केले.
आश्वासित प्रगती योजना, कॅशलेस योजना, अन्यायग्रस्त बदली धारक शिक्षक, शाळाबाह्य कामे, दिल्लीचा मोर्चा, सभासद नोंदणी, विद्यार्थी गुणवत्ता वाढ, संघटनात्मक कार्य आदी विषयाबाबत सखोल मार्गदर्शन करून सर्वसामान्य चर्चा केली.
याप्रसंगी राज्य, विभाग, जिल्हा, पदाधिकारी सह सर्व तालुका अध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यातील सर्व राज्य, विभाग , जिल्हा, तालुकास्तरीय पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
