
मोरेवाडी (प्रतिनिधी)”. १५”व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत कासारी मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडीस प्रिंटर देण्यात आले.सरपंच काशिनाथदादा काळे यांनी संगणकीय युगात नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी सदर प्रिंटरविथ झेरॉक्स या साधनाचा शाळेत नियमित वापर करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवाव्यात,अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.सदर उपकरणासाठी ग्रामपंचायत सरपंच काशिनाथदादा काळे,उपसरपंच अंबादास पवार,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक सतिश काकळीज,लिपिक उमेश पाटील यांचे विशेष प्रयत्न लाभले.याप्रसंगी मोरेवाडी शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, उपाध्यक्ष नवनाथ पवार,सदस्य भिमबाई मोरे,शिक्षणतज्ञ अविनाश कर्नर,शहाबाई मोरे,सुरेश मोरे,मनीषा मोरे,नवभारत साक्षरता स्वयंसेवक ज्ञानेश्वर सोनवणे,शाळेचे सर्व पालक,मुख्याध्यापक गणेश बागुल सर,सहशिक्षिका योगिता कापुरे मॅडम यांनी शाळेच्यावतीने ग्रामपंचायत कासारीचे विशेष आभार मानले.
