
नाशिक:-( प्रतिनिधी )सातारा येथे संपन्न होणाऱ्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त मंगळवार (दि.१८) रोजी निमंत्रित कवींची “काव्यसंध्या” रंगणार आहे.
सावानाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या काव्यसंध्येत ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल संधान, सोमनाथ साखरे, अरुण इंगळे, पंकजकुमार गवळी, जी.पी.खैरनार या निमंत्रित कवींचे बहारदार कविसंमेलन संपन्न होणार आहे. सूत्रसंचालन विडंबनकार संजय आहेर करतील. साहित्यिक आणि रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी, अ.भा.मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, जलालपूर शाखेने केले आहे.
