
नाशिक (प्रतिनिधी ) मविप्र समाजाचे आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिर, गंगापूर रोड, नाशिक २ या शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा झाला .बालदिनाचे औचित्य साधून अभिनवच्या बालगोपाळांना भेटीस आलेले प्रमुख अतिथी व बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी, होरायझन अकॅडमीचे संगीत शिक्षक अभिजीत सुरळीकर व शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी , संगीता जाधव, ज्येष्ठ शिक्षिका रंजना पाटील,अर्चना ठाकरे , विलास जाधव, अर्चना वाळके, उपस्थित होते,

या सर्वांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले .बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह दिसून येत होता .बाल दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी, फुले ,पशुपक्षी, स्पायडरमॅन ,ढग ,फुलपाखरे , फळे , संत ,वारकरी , यांच्या वेशभूषेत आलेले होते .अभिनव चे प्रांगण बालकांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते . विविध रंगांची फुले,विविध रंगांचे प्राणी पक्षी यामुळे जणू शाळेला नवचैतन्य प्राप्त झाले होते .श्री राजेंद्र सोमवंशी हे एक आदर्श व गुणवंत शिक्षक असून उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

तसेच त्यांनी कविता लेखन विशेषता बालसाहित्यावरील विशेष लेखन केलेले असून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत. होरायझन अकॅडमीचे संगीत शिक्षक अभिजीत सुरळीकर यांनी विविध बालगीते व कविता यांचे गायन केले.वर्गवार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाल दिनाची माहिती सांगितली. शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना चाचा नेहरू यांच्या विषयी माहिती सांगितली तसेच वेशभुषेतआलेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले आणि पालकांनी व शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचेही कौतुक केले .सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या .बाल दिनानिमित्त शाळेतील उपशिक्षिका वैशाली मोरे यांनी सविस्तर अशी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना वर्गवार कार्यानुभव च्या वहीत बालदिनाची माहिती लेखन करण्यास सांगितले.आगळा वेगळा असा आनंदात व उत्साहात बालदिन साजरा झाला.बाल दिनानिमित्त वर्गवार श्लोक पाठांतर स्पर्धा घेण्यात आली.कार्यक्रमाचे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता वाघ यांनी केले.
