
१५ नोव्हेंबर२०२५ जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमीत्त आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व महामिञ परिवार यांच्या,वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामिञ दत्ता वायचळे म्हणाले की,
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश सरकार विरुध्द आदिवासींच्या अस्तीत्वाची मोठी लढाई लढली.ब्रिटीश सरकारने वन कायदा केल्यामुळे आदिवासींचे वनसंपत्ती वरील हक्क काढले गेले.त्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागले लोकांवर उपासमारीची वेळ आली वन कायदा मागे घ्यावा म्हणुन न्यायालयामध्ये याचिका दखल केली परंतु न्यायालयाने ती फेटाळली त्यामुळे आदिवासींमध्ये असंतोष पसरला.१८९४ साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला होता.उपासमारी महामारीमुळे अनेक माणसं मरण पावली.इंग्रज सरकारने अवाजवी शेतसारा वसुली सुरू केली.

सरकारने सावकार,जहागिरदार,जमिनदार यांच्या मार्फत आदिवासींचे शोषण,जुलूम,अत्याचार चालु केले.त्या विरोधात बिरसा मुंडाने आदिवासींना एकञित करून त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणिव करून दिली.बिरसाने ब्रिटीश सरकार विरोधात “उलगुलान” आंदोलन सुरू केले.जल,जमिन,जंगल यांच्यावर आदिवासींचा अधिकार आहे तो तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही.असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले.बिरसा मुंडांच्या नेञुत्वाखाली आदिवासींनी धणुष्यबान,भाले इत्यादी हत्यारांनी अनेक लढाया लढल्या ब्रिटीश सरकारकडे अत्याधुनिक शस्रास्रे होती तरी देखिल १८९८ मध्ये तांगा नदीच्या काठी बिरसा मुंडांनी ब्रिटीश सैन्याला हरविले परंतु अतिरीक्त सैन्य आल्यामुळे आदिवासींना रोकण्यात यश आले या लढाईत ४००चे वर आदिवासी शहिद झाले.बिरसा मुंडा डोमबाडी पहाडांमध्ये आदिवासी जनतेला मार्गदर्शन करत असताना ब्रिटीश सैन्याने त्यांच्यावर हल्ला चढविला आदिवासी व ब्रिटीश्यांमध्ये तुफान लढाई होऊन अनेक जन शहिद झाले तर बिरसा मुंडा सहित अनेकांना जेरबंद केले.बिरसा मुंडांना रांचीच्या कारागृहात आणुन एका कोठडीत ठेवले.त्यांनी अन्नत्याग केला रक्ताची उलटी होऊन वीर मरण आले.बिरसा मुंडा देशासाठी आदिवासींच्या हक्कासाठी शहिद झाले.बिरसा मुंडांच्या आंदोलनामुळेच आदिवासी जमिन कायदा निर्माण झाला.बिरसा मुंडांच्या आंदोलनामुळेच महात्मा गांधींना प्रेरणा मिळाली.आदिवासींमध्ये स्वत:च्या अस्तित्वाची,अस्मीतेची,संस्क्रुतीची जाणिव बिरसा मुंडांनी करून दिली अशा महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन!..
सुञसंचलन प्रकाश गुंजाळ यांनी केले.व प्रास्थाविक विजय मुठे यांनी केले.तर आभार रुपेश मुठे यांनी मानले.
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मूठे,माजी नगरसेवक रुपेशभाऊ मुठे,योगेश क्षत्रिय, माधव मूठे,विनोद गवळी,नितीन जिम्मी जाधव,नितीन सागळे,दत्ता परदेशी, सोहम शिंदे, गोविंद लहमगे, अर्जुन रोहित मुठे प्रकाश गुंजाळ योगेश मोरे पोपट वायचळे किरण मुठे ,संदिप मुठे,,निलेशभाऊ तराळा,प्रमोद पाववी,आभि जाधव,अदि उपस्थित होते.
