
नाशिक (प्रतिनिधी ) आपले क्रीडा नैपुण्य दाखविणाऱ्या खेळाडूंना भविष्यात क्रीडा क्षेत्रात अनेक संधी असल्याने खेळाडूंनी अथक परिश्रम करून यशाला गवसणी घालावी असे आवाहन राज्याचे क्रीडामंत्री अँड. माणिकरावजी कोकाटे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा व युवक सेवा संचालनालय विभाग व नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या १९ वर्षाआतील खो-खो (मुले -मुली) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथे दिनांक १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान स्पर्धा संपन्न होत आहेत.

नाशिक येथे भारतीय खेळांसाठी इनडोअर स्टेडियम निर्माण करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून त्यासाठीच्या प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले.त्याचप्रमाणे खेळाडूंच्या वसतीगृहाच्या दुरूस्तीचा आराखडाही तयार करण्याबाबत सूचना दिल्या.
शासनाच्या वतीने खेळाडूंना अधिक सोयी सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रीडा पिठावर क्रीडा विभागाच्या उपसंचालिका स्नेहल साळुंखे , नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, धुळ्याचे क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू दत्तू भोकनळ , आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश शिंदे, संजीवनी जाधव, भूमिका नेहते,रेश्मा राठोड,त त्र्यंबकेश्वरच्या उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे , शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे ,आनंद खरे, नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनचे आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, मंदार देशमुख, उमेश आटवणे, गीता देशमुख, रविंद्र नाकील, कांतीलाल महाले आदी उपस्थित होते.
