
सिन्नर (दि. १५ नोव्हेंबर २०२५) : सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था सिन्नर संचलित महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुलामध्ये शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी संस्था पदाधिकारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची सहविचार सभा उत्साहपूर्वक व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.दत्ता लोंढे होते. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री.नामदेव लोणारे, सहसेक्रेटरी मा.श्री.संजय माळी, खजिनदार मा.श्री.रामनाथ बलक, CSR समिती अध्यक्ष मा.श्री.दत्तात्रय गोळेसर, माध्यमिक विभाग शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा मा.सौ.मंगलताई झगडे, प्राथमिक विभाग शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.श्री.दिगंबर पगर, संचालक मा.श्री.दत्तात्रय लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच संकुलातील संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा.राहुल वरंदळ, संकुलाचे प्राचार्य श्री.मधुकर देशमुख, महिला महाविद्यालय प्राचार्य प्रा.गोकुळ महाले, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ.संगीता राजगुरू, उच्च माध्यमिक विभाग उपप्राचार्य प्रा.एकनाथ माळी, पर्यवेक्षिका सौ.सविता काठे आणि सर्व विभागांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
🔹सभेतील चर्चेचे मुख्य विषय🔹
या सहविचार सभेमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी सुरक्षा, नवोन्मेषी उपक्रम, १० वी व १२ वी बोर्ड परीक्षांचे नियोजन, विभाग विकास योजना, शिस्तपालन, कार्यालयीन कार्यपद्धती, सीएसआर उपक्रम, शैक्षणिक निकाल, पालक सहभाग, डिजिटल साधने, शैक्षणिक स्पर्धा परीक्षा, बाह्य उपक्रम, प्रगत-अप्रगत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षकांच्या अडचणी व अपेक्षा या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

🔸संस्था पदाधिकारी यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना🔸
1️⃣ प्रत्येक विभागाने नियमित बैठका घेऊन उद्दिष्टाधिष्ठित कृती आराखडा तयार करावा
2️⃣ विद्यार्थी सुरक्षा व शिस्तपालन प्रथम प्राधान्याने राबवावे
3️⃣ बोर्ड परीक्षांसाठी नियोजनबद्ध अभ्यास, ट्रॅकिंग व नियमित चाचण्या घेण्यात याव्यात
4️⃣ डिजिटल शिक्षण साधने, ICT व प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग यावर अधिक भर द्यावा
5️⃣ सीएसआर प्रकल्पांतर्गत शैक्षणिक गुणवत्तावाढ हा केंद्रबिंदू ठेवावा
6️⃣ शिक्षकांनी विद्यार्थी-केंद्रित शिक्षण तंत्र अवलंबून नवोन्मेषी उपक्रम राबवावेत
7️⃣ पालक-शिक्षक संवाद वाढविण्यासाठी प्रक्रिया व उपक्रम राबवावेत
8️⃣ कर्मचारी वर्गाने कार्यालयीन शिस्त, वेळपालन व नोंद व्यवस्थापन काटेकोरपणे पाळावे
9️⃣ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व विशेष अभ्यासिका चालू करण्याकडे लक्ष द्यावे
🔟 विद्यार्थ्यांच्या मनोरंजन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमांनाही प्राधान्य द्यावे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडा शिक्षक श्री.किरण मिठे यांनी केले.
