
अध्यक्षपदी इंजी.बाळासाहेब मगर
नाशिक कवीचे अध्यक्षपदी इंजी.बाळासाहेब मगर, कार्याध्यक्ष सुभाष सबनीस तर कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे यांची निवड
नाशिक दि. १५- (वार्ताहर)- नाशिक कवी ही संस्था गेली बावीस वर्षे कार्यरत असुन उपक्रमांचे सातत्य राखणारी आणि संस्थेच्या ध्येयधोरणांनुसार काव्यक्षेत्रामध्ये संपुर्ण राज्यात नावलौकीक मिळवलेली एक महत्वाची संस्था आहे. २००३ च्या नोव्हेंबर महिन्यात ज्येष्ठ साहित्यिक शरद पुराणिक यांनी स्थापन केलेल्या नाशिक कवी या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सभेमध्ये कार्यकारिणीची निवड करण्यात आली

कार्याध्यक्षपदी सुभाष सबनीस
असुन अध्यक्षपदी इंजि. बाळासाहेब मगर तर कार्याध्यक्षपदी सुभाष सबनीस आणि कार्यवाह म्हणून नंदकिशोर ठोंबरे यांची निवड करण्यात आलेली आहे. नूतन कार्यकारीणी पुढीलप्रमाणे, संस्थापक शरद पुराणिक, अध्यक्ष इंजी बाळासाहेब मगर,

कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे
कार्याध्यक्ष सुभाष सबनीस कार्यवाह नंदकिशोर ठोंबरेकार्याध्यक्षपदी सुभाष सबनीस उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी, कार्यकारीणी सदस्य – स्मिता बनकर, अलका कुलकर्णी,भारती देव, प्रांजली आफळे,अजय बिरारी, किरण मेतकर, सुरेश चौरे, राजेश जाधव. कवींचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या नाशिक कवीचा दर महिन्याला होणारा काव्यवाचनाचा कार्यक्रम गेले बावीस वर्षे सातत्याने सुरु आहे. अगदी कोरोना काळातही हा उपक्रम ऑनलाईन पध्दतीने सुरु होता. विविध काव्य पुरस्कार आणि काव्यस्पर्धांबरोबरच कवितेचे कता, गझल, गीतलेखन, छंदोबद्ध तसेच वृत्तबद्ध काव्यलेखन असे विविध प्रकार कवींना हाताळता यावेत म्हणून घेतल्या जाणार्या कार्यशाळा आयोजनाचे कार्यक्रम हे नाशिक कवीचे वैशिष्ट्य आहे. नाशिक कवीच्या माध्यमातून सकस कविता लिहिणार्यांची संख्या वाढावी यासाठी नवीन कार्यकारीणी प्रयत्नशील आहे. या कार्यकारीणीमध्ये नवीन कवींबरोबरच, कार्यकर्ते आणि भविष्यकाळात संस्थेची धुरा वाहू शकतील असे हात निर्माण व्हावेत म्हणुन संस्थेच्या कामाला वेळ देऊ शकणार्या काही नवीन कवींची निवड करण्यात आलेली आहे हे नवीन सदस्य मोठ्या उत्साहाने संस्थेसाठी वेळ देतील अशी आशा अध्यक्ष इंजि. बाळासाहेब मगर यांनीव्यक्त केली.
