
सिन्नर (प्रतिनिधी ) क्रांतिगुरू लहुजी उस्ताद साळवे यांची जयंती महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड याच्या वतीने सिन्नर येथे साजरी करण्यात आली
यावेळी क्रांतिगुरू लहुजी साळवे व रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की पहिले क्रांतिकारक सत्यशोधक उस्ताद लहुजी साळवे यांचा जन्मदिन: पेशवाईच्या समाप्तीनंतरही पुण्यात ब्राह्मणांचा प्रभाव कमी झाला नाही. इंग्रजांच्या राजवटीतही अस्पृश्यता शिगेला पोहोचली होती. ज्यांनी शूद्रांवर आणि अतिशूद्रांवर जातीय अत्याचार केले होते ते आता ब्रिटिश प्रशासनात नोकर म्हणून तिथे काम करत होते.त्याच वेळी, सुरुवातीचे क्रांतिकारी सत्यशोधक उस्ताद लहुजी साळवे जी यांनी ब्रिटिश आणि युरेशियन या दोन परदेशी लोकांविरुद्ध चळवळ सुरू केली.पहिले क्रांतिकारी उमाजी राजे ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्यापर्यंत झालेल्या संघर्षाचे ते सक्रिय नेते होते.
तलवार आणि लेखणी, शारीरिक ताकद, बौद्धिक ताकद, मनोबल, संघ ताकद आणि आर्थिक ताकद या दोन्हींचा वापर करून ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्यासोबत उभे राहिले.महिला शिक्षणाच्या कामात ब्राह्मण शक्य तितके अडथळे निर्माण करत होते, त्यांना धमकावण्याचे आणि मारण्याचे प्रयत्न केले जात होते, जेव्हा अस्पृश्य मुलींसाठी शाळा सुरू झाल्या, फुले जातिव्यवस्थेच्या पायावरच घाव घालत होते, तेव्हा पहिले क्रांतिकारी सत्यशोधक उस्ताद लहुजी साळवे त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचा पाठिंबा ही एका मोठ्या क्रांतीची सुरुवात होती.अशा क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे
त्यांच्या जन्म जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन तसेच
यावेळी विजय मुठे यांनी आपले मनोगत व्यक्त करण्याताना म्हणाले की रामजी मालोजी सकपाळ ( रामजी आंबेडकर) नावाने प्रसिद्ध होते हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये ‘सुभेदार’ पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या. भीमरावाने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामितुन बाहेर काढावे ही रामजी आंबेडकरांची इच्छा होती त्यांनी भीमरावला उच्च शिक्षण देण्यासाठी खूप प्रयत्न केले, जेणेकरून तो समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढू शकेल. त्यांच्यामुळेच आपल्या देशाला भारतीय संविधान लिहिणे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर शके झाले एक आदर्श वडिल ज्यांनी मुलाला अभ्यासाले महत्त्व पडवुन दिले आणि या भारतभुमीला नवा भाग्यविधाता घडवुन दिला अशा महान पितृत्वाला जयंती निमीत्त सुभेदार रामजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सुञसंचलन रुपेश मुठे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.व योगेश मोरेआभार यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे प्रकाश गुंजाळ, संदिप मुठे,योगेश मोरे,लखन पाचोरे रोहित मुठे,किरण मुठे,बाळासाहेब जाधव, माऊली शामा डांगे, भीमा मदगे आदि उपस्थित होते
