
मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात जननायक, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करताना उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण व शिक्षक वृंद
नांदगाव – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय जनजाती गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, जेष्ठ शिक्षक अशोक मार्कंड व उपस्थितांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी इ. १० वी ई च्या विद्यार्थ्यिनींनी आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणारे आदिवासी नृत्य सादर केले व त्यांना मार्गदर्शन उपशिक्षिका स्मिता केदारे , जया गवळी सायली पाटील यांनी केले.उपशिक्षिका सुनंदा जाधव यांनी आदिवासी गीत गायन केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘वारली’ चित्र रेखाटले. यादिवशी हरित सेनेच्या मदतीने आदिवासी भागात वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यालयातील उपशिक्षिका सुवर्णा अहिरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या की, हा दिवस महान जननायक व स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यालढ्यात (आदिवासी) समुदायाचे जे अमूल्य योगदान आहे त्याचा सन्मान करणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यांनी ‘उलगुलान'(महान क्रांती) ची हाक देऊन आदिवासींना जमीन, जंगल आणि पाण्यावरील त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास प्रेरित केले.

अध्यक्षीय मनोगतातून उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्र सरकारने सन २०२१ पासून हा दिवस ‘जनजाती गौरव दिन ‘ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना ‘धरती आबा’ ( धरतीचा पिता) म्हणून ओळखतो.जनजातीय संस्कृती आणि वारसा यांचे संवर्धन करण्याच्या त्यांच्या भूमिकेचा आदर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर तर आभार प्रदर्शन सुनील सुपेकर यांनी केले.
