
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०९१ वा दिवस
भारतात अन्नदान, विद्यादान व प्राणदान (जीवनदान) ही विशेष प्रशंसली जातात. या सर्वांमध्ये विद्यादानाला अग्रस्थान आहे. एखाद्याने दुसऱ्याचे प्राण वाचविले तर ती चांगली गोष्ट आहे. पण एकाने दुसऱ्याला ज्ञान दिले, त्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या सूर्य प्रकाशाची वाट दाखवली तर, ती त्याहून अधिक चांगली गोष्ट आहे. ज्ञानाहोऊन अधिक मोठी अशी जगात दुसरी कोणतीही शक्ती नाही. सर्वसामान्य, दुःखी, पिडीत जनतेला तुम्ही ज्ञानी, शिक्षित केले पाहिजे. ज्ञानदान निरपेक्ष भावनेने करणे आवश्यक आहे. ज्ञानाचा विक्रय करणे निंदास्पद ठरते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २५ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १६ नोव्हेंबर २०२५
★ १९२७ सुप्रसिध्द मराठी – हिंदी चित्रपट अभिनेते, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचा जन्मदिन.
★ १९२८ मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्मदिन.
★ १९४५ युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
★ राष्ट्रीय पत्रकारिता दिन.
