
नांदगाव ( प्रतिनिधी ) दि.14 नोव्हेंबर 2025 नांदगाव, येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बालदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्कूलचे प्राचार्य श्री मणी चावला व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पंडित नेहरू व माता सरस्वती यांच्याप्रतिमेचे पुजन करण्यात आले

.शाळेतील शिक्षका तसलीम बारमल यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्ताने मार्गदर्शन केले. चांदनी पारख, प्रतिभा भोपळे व विनोद अहिरे यांनी सुंदर असे गीते सादर करून विद्यार्थ्यांना मंञमुग्ध केले. . त्याचबरोबर शाळेतील पूर्व प्राथमिक विभागाच्या महिला शिक्षकांनी सुंदर असे समूह नृत्य, नाटिका सादर करत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी शाळेतील शिक्षकांनी फुड स्टाॅल लावले होते.त्यावर विद्यार्थ्यांची झुबंड उडाली. अशा पध्दतीने एक वेगळ्या पध्दतीने विद्यार्थ्यांसाठी बालदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांदनी पारख व कविता चौधरी यांनी केले.

सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल सेक्रेटरी विजय चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, सुशीलभाऊ कासलीवाल, रिखबकाका कासलीवाल, जिगोलकिशोर अग्रवाल, महेंद्र भाऊ चांदीवाल, तसेच प्राचार्य मनी चावला, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

