नासाका विद्यालयात बालदिनी पंडित नेहरू यांना अभिवादन करताना मुख्याध्यापक अरुण पगार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी.
नाशिकरोड:- पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणजेच बालदिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी मुख्याध्यापक अरुण पगार यांच्यासह विद्यार्थी आणि सर्व शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक अरुण पगार यांनी पंडित नेहरू यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शिक्षक बाळासाहेब गायधनी यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले.