
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या सुविदय पत्नी तथा खंबाळे (पुर्वाश्रमीचा शिरसाटे – धारगाव) जि.प.गटाच्या जि.प.सदस्या सौ.सुशिला काशिनाथ मेंगाळ या सलग दहा वर्ष जि.प.सदस्या असुन तिसर्यादां त्या मैदानात उतरणार आहेत.यावेळी त्या नांदगाव सदो जि.प.गटातुन मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळु लागल्याने विदयमान जि.प.सदस्य कावजी ठाकरे यांचे समोर तगडे आव्हान उभे ठाकल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.हयामुळे नांदगाव सदो गटात चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.
माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सौ. सुशिला मेंगाळ यांनी यापुर्वी माजी खासदार हेंमत गोडसे यांच्या एकलहरा जि.प.गटातुन निवडणुक लढवली होती व जिंकलीही होती.त्यानंतर गत वेळी त्यांनी शिरसाटे जि.प. गटातुन निवडणुक लढवली होती.सा ही निवडणुकीत विजय मिळवत सौ.सुशिला मेंगाळ या दुसर्यादां जि.प.सदस्या झाल्या होत्या.
पुर्वाश्रमीचा शिरसाटे जि.प.गटा चे नामकरण खंबाळे झाले असुन या गटातुन मेंगाळ परिवारातील सदस्यच पुन्हा दावा ठोकतील अशी चर्चा होती.या शिवाय वाडिवर्हे जि.प. गटावर ही माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी दावा ठोकला होता.यावरुन त्यांचेत व माजी आमदार सौ.निर्मला गावित या स्व पक्षीय नेत्यामध्येच रंगलेली चुरस ही अनेकानीं पाहिली होती.
या पाश्वर्भुमी वर मेंगाळानी पत्नीस तिसर्यादां रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले असुन नांदगाव सदो जि.प.गटातुन उतरण्याचे संकेत दिले आहेत.
मेंगाळाच्यां या गुगलीमुळे कावजी ठाकरे या विदयमान जि.प. सदस्यासमोर तगडे आव्हान उभे ठाकले आहे.
नांदगाव सदो गट व कावजी ठाकरे हे समिकरण येथे पक्के असुन यापुर्वी त्यांना फारसे आव्हान नसल्याने लढती सोप्या होत्या. यंदा मात्र हे दोन्ही दिग्गज नेते आमने सामने ठाकल्याने लढतीतील रंगत वाढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान शिवसेना शिंदे गटात माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, सौ. निर्मला गावित व माजी पं.स.सदस्य गोपाळा लहांगे या तीनही पारंपारीक व एकेकाळच्या प्रतिस्पर्ध्यी नेत्यांमध्ये वाडिवर्हे व खंबाळे जि.प.गटावरुन अंतर्गत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे.कदाचित यावर तोडगा म्हणुन मेंगाळ हे नांदगाव सदो गट, गोपाळा लहांगे हे वाडिवर्हे गट व सौ.गावित खंबाळे गट असे तर ठरले नाही अशी चर्चा रंगली आहे.
