
कुंदेवाडी ( प्रतिनिधी) दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी ठीक साडे अकरा वाजता शाळेत बाल दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.मंगेश भुजबळ उपाध्यक्ष मा.श्री.विलास काळे, शिक्षणप्रेमी,मा.श्री.विनोद मोरे मा.श्री.वैकुंठ पाटील शिक्षणतज्ञ श्री.अभय बलदोटा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी
माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.विनोद ढमे,
श्री.बाळासाहेब ताडगे,
श्री.सुनिल घेगडे
श्री.दिलीप कोकाटे,सौ.तृप्ती जाधव, पुजा मोरे ,भाग्यश्री वावधाने,निलम सोनवणे,शेहनाज मनियार ,सविता गवळी, योगिता शिंदे, सर्व शिक्षक,विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन केले.

श्रीमती लायरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर विद्यार्थ्यांनी चाचा नेहरू यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे यांनी चाचा नेहरू यांच्याविषयी गीत सादर केले. श्रीमती पाटील मॅडम यांनी चाचा नेहरूंच्या जीवनातील गोष्ट सांगितली. विद्यार्थ्यांना बाल दिनानिमित्त निखळ व निर्भेळ आनंद मिळण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्यात विविध खाद्यपदार्थ ,फळे ,भाजीपाला , विविध वस्तू यांचे विविध स्टॉल लावण्यात आले. मुलांमध्ये श्रमप्रतिष्ठा व कमवा व शिका या मूल्यांची रुजवणूक होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.शाळेत हसत खेळत व कृतीतून शिक्षण देण्यासाठी शाळा विविध उपक्रम राबवत असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पुनम महाजन मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती लायरे मॅडम श्रीमती पाटील मॅडम श्रीमती महाजन मॅडम कुमारी महेश्वरी जाधव युवा प्रशिक्षणार्थी,पोषण आहार कार्यकर्ते सौ.सरला पवार व सौ.अनिता पवार यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे समस्त ग्रामस्थ,माता पालक यांनी विशेष कौतुक केले.
