
सिन्नर ( प्रतिनिधी)१४ नोव्हेंबर २०२५ भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साजरी करण्यात आली
याप्रसंगी छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास व पंडित जवाहरलाल नेहरू प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरनी लिहिल्या भारतीय संविधान भारताची नवीन राज्यघटना, जी २६ जानेवारी १९५० प्रजासत्ताक दिन रोजी लागू केली. या घटनेने भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनवले. नवीन प्रजासत्ताक हे “राज्यांचे संघराज्य” म्हणून घोषित करण्यात आले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जनतेसाठी आर्थिक विकास साधण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी अनेक योजना सुरू केल्या, ज्यामध्ये योजना आयोग स्थापन करणे आणि पंचवार्षिक योजना आणणे हे महत्त्वाचे होते. या योजनांचा उद्देश गरीबी कमी करणे, समानता आणणे आणि सर्वांना शिक्षण व रोजगार उपलब्ध करणे हा होता. त्यांनी कृषी, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना दिली.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कामगारांसाठी कर्मचारी राज्य विमा (ESI) योजना सुरू केली, जी कामगारांना आजारपण, अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास सामाजिक सुरक्षा प्रदान करते. या योजनेत कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा आणि कायमस्वरूपी किंवा तात्पुरते अपंगत्व आणि रोजगारादरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबांना वैद्यकीय सेवा.नोकरीत असताना दुखापत किंवा मृत्यू झाल्यास रोख लाभ.व्यावसायिक धोक्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन सध्याच्या पेन्शन योजना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना: ही असंघटित कामगारांसाठी एक पेन्शन योजना आहे. यात ६० वर्ष पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय पेन्शन योजना निवृत्तीनंतर आर्थिक तरतुदीसाठी ही भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनासाठी योजना सुरू केल्या त्यामुळे, कामगारांसाठी असलेल्या पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा योजना पंडित नेहरूंच्या काळात सुरू झालेल्या अशा महान प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे तर आभार मनोज माळी यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, प्रकाश माळी मनोज माळी नामदेव बोऱ्हाडे, राजेंद्र देशमुख, गणपत काळे, संजय घोरपडे, नितीन शिरसाठ गौरव देशपांडे आदि.उपस्थित होते
