
हरिश्चंद्र लोंढे… वक्तृत्व व कर्तृत्वाचा संगम*
दिवंगत हरिभाऊंच्या स्मृतींना विनश्न अभिवादन..!!
सिन्नर (प्रतिनिधी ) सिन्नरच्या सार्वजनिक जंवनात अनेक घराण्यांनी आपले योगदान दिले आहे. त्यापैकी लोंढे गल्लीतील लोंढे घराणे हे एक घराणे राहिले. हरीश्चंद्र लोंढे नाना हे या घराण्यातील नामंकीत पुरूष राहिले. आज १४ नेव्हेंबर त्यांची जयंती. नांव जरी हरिश्चंद्र असले, तरी सिन्नरकर कुणी त्यांना आदराने हरिभाऊ म्हणायने कुणी नाना म्हणायने, तसा हरिभाऊंचा व त्यांच्या परिवाराचा राजकारणाशी पनिष्ठ संबंध राहिलेला नव्हता, शेती माती आणि शेती संस्कृती बरोबर आखाड्यातील लाल मातीशी समरस झालेले हे कुटुंबिय राहिले. स्व. नानासाहेब गडाख व माजी मंत्री रूप. तुकारामजी दिघोळे यांचे निष्ठावंत सड़कारी म्हणून हरिभाऊंची ओळख राहिली. अलिकडच्या तरूण पिढीला हरीभाऊ किती
आणि कसे आठवतील हे सांगणे तसे अवघडच आहे. सिन्नरचे प्रथम नागरिक होण्याचा मान त्यांना दोनदा मिळाला. पक्षाच्या जातीच्या आणि धर्माच्या भिंती ओलांडून सामान्य सिन्नरकरांनी हरिभाऊंचे नेतृत्व स्विकारले. पत्नी भामाताई यांनी पण शहराचे नगरध्यक्षपद भुषविले. शहराच्या राजकारणात लोंढे घराण्याचा सतत दबदबा राहिला.. नगर पालिकेत नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना हा माणूस सामान्य नागरीकांचे निरक्षरांचे आणि अज्ञानी फाटक्या माणसा चं प्रतिनिधित्व करतो, ही भावना शहरवासीयांच्या मनात कायम राहिली आहे. माझे वडील स्व. बाबुराव कोतवाल (मामा) हे नगर पालीकेत 38 वर्ष नाके कारकुन होते. एक तृतीय श्रेणीतील नगरपालिकेचे कर्मचारी व
पार्ट टाईम विडी कामगार असलेले माझे वडील अतिशय निष्कपट व सरळमार्गी माणुस. त्यांच्या नगर पालिकेच्या सेवा काळात हरीभाऊंनी नगराध्यक्ष पदाचा तोरा न मिरवता वडीलांचा पित्यासमान कायम सन्मान व आदर ठेवला. आमचे वडील शेवटपर्यंत हरीभाऊंचे असलेले मोठेपण नेहमी बोलुन दाखवायने हरीभाऊंना राकट दणकट व उम्र असलेल्या प्रतिमेचा राजकारणात नक्कीच फायदा त्यांना झाल. पण त्यांच्या या शारीरीक बलस्थानचा गैरफायदा त्यांनी कधीच घेतला नाही, त्यांचे धारदार व तिक्ष्ण शब्द हे जीवघेणे नसायचे, तर डॉक्टरांच्या शस्त्राप्रमाणे जीव वाचावणारे असायचे, मरण आणि तोरणं या दोन्ही गोष्टीत हरीभाऊ सामान्य माणसाच्या पाठीशी एखाद्या पहाडाप्रमाणे ऊभे
रहायचे, अयोध्येतील वादग्रस्त वास्तु उध्दवस्त झाल्यानंतर संपूर्ण देशभरात धर्माधतेचा वणवा पेटल्यानंतर सिर मात्र त्याला अपवाद ठरले. हरीभाऊंनी नगराध्यक्ष असतांना रस्त्यावर उतरून हिंदु मुस्लिम समाजाचे टिकवलेले सामाजिक ऐक्य ही हरीभाऊंच्या अफाट कर्तृत्वाची साक्ष होती. तहानलेल्या स्सिारची गरज ओळखून स्व. दिघोळे आमदार असतांना शहरालाठी राबनलेली पाणीपुरवठा योजना, पोस्ट ऑफीससमोरील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेची जागा, सरस्वती नदीवरील शॉपींग सेंटर साठी अतिक्रमण काढताना कुठल्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय खाली करणे या गोष्टी सहज शक्य नव्हत्या, पण त्यांनी त्यावर आपल्याला कार्य कौशल्याने लिलया मात केली. सिन्नरच्या सर्वच क्षेत्रात सहजपणे मुशाफीरी करणारा, बिकट वाटेलाच वहिवाट बनविणारा, सतत गर्दीतील माणसांत
व वरणारा, घरातील चुलीतील निखारा सतत पेटता ठेवुन येणाऱ्या पै पाहुण्यांच्या मुक्त हन्ते उदरभरण करणान्य हरीभाऊंसारख्या निखाऱ्याला उत्तरार्धात विस्मृतीच्या आजाराने प्रसले. हरीभाऊंच्या निर्वाणीच्या काळातही देवघरातील समई प्रमाणे लोंढे परिवाराला सतत तेवत ठेवण्याचे काम भामाताईंनी केले. पत्नी भामाताईंनी हरीभाऊंना आजारपणाच्या संकटात दिलेली अखंड भिरोदात्त साथ ही त्यांच्यातील पत्नीत्वाची साक्ष होती. उदय आणि अस्त हा निसर्गाच नियम आहे. पण हरीभाऊंनी जाण्याची नक्कीच घाई केली, असं मी म्हणेल. असो, खेळ कुणाला दैवाचा कळला? जसा नियतीचा फतवा. दिवंगत हरिभाऊंच्या स्मृतींना विनश्न अभिवादन..!!
नामदेवराव कोतवाल, राजकीय विश्लेषक, सिन्नर
