
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
ईगतपुरी तालुक्यातील वाडिवर्हे या औदयौगीक वसाहत पट्टा असलेल्या महत्त्वपुर्ण जि.प. गटावर सगळया जिल्हयाचे लक्ष लागुन आहे.या गटावर वाडिवर्हे या औदयौगीक ग्रामपालिकेचे माजी सरपंच तथा ईगतपुरी पंचायत समिती चे माजी सभापती गोपाळा लहांगे यांचे नाव आघाडीवर आहे.
जि.प.गटात वाडिवर्हे गावाची मतदार संख्या सर्वाधिक व निर्णायक आहे.जि.प.सदस्य कोण हे या गावावर ठरते,मात्र असे असतानांही आजवर या गावचा जि.प.सदस्य झालेला नाही ही खंत आहे.
यावेळी वाडिवर्हे गावातुनच जि.प.सदस्य निवडुन दयायचा असा नागरिकाचां निर्धार आहे.
त्यामुळे गाव व तालुक्याचे समर्थ नेतृत्व करणारे गोपाळा लहांगे हयांचे पारडे जड मानले जात असुन शिवसेनेकडुन त्यांनी उमेदवारूसाठी दावा ठोकला आहे.
तालुक्यातील अत्यंत आक्रमक , धाडसी व कामसु नेतृत्व म्हणुन लहांगे यांचा बोलबाला आहे.जिथे इतर सर्वच पक्षीय नेत्याचें अळी मिळी, चुप गिळी सुरु असते, तिथे भल्याभल्यानां अंगावर घेत अन्यायाविरुद्ध भिडण्याची धमक लहांगे यांचे अंगी आहे.त्यांनी अनेक दिग्गजाचीं अनेक प्रकरणे बाहेर काढुन पळता भुई थोडी केल्याचा इतिहास आहे.
सामान्य कुंटुबातुन आलेल्या लहांगे यांनी वाडिवर्हे सारख्या औदयौगीक वसाहतींवर सलग दहा वर्षे सत्ता गाजवली हे विशेष.ईगतपुरी पंचायत समिती सभापती पदाचे काळात इतर नामधारी सभापतीचें तुलनेत त्यांनी आपला दरारा प्रस्थापित करत अल्पकाळात कामाचा ठसा उमटवला होता.नाशिक महानगर नियोजन समितीवरही त्यांनी काम केलेले आहे.आदिवासी बांधवाच्या प्रश्नावर ते अत्यंत आक्रमक मानले जात असुन, ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणुन त्यांचेकडे पाहिले जात आहे.
