
मुलांनी नियमितपणे वाचन करावे:-मुख्याध्यापक उगले
सिन्नर प्रतिनिधी( सोमनाथ गिरी ) :- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भूतपूर्व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते. व्यासपीठावर पर्यवेक्षिका जयश्री पगारे, ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ गिरी, कचेश्वर शिंदे,रेखा खंडीझोड, मारुती डगळे,रामदास वारुंगसे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते .नेहरू यांच्या जीवन व कार्याचा परिचय आराध्या वाजे,अनुष्का माळी, अनन्या कडभाने या विद्यार्थ्यांनी करून दिला.इयत्ता आठवी तु- ब चे वर्गशिक्षक सोमनाथ गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.

यावेळी बोलतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष उगले म्हणाले की,नेहरू यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. नेहरूंना लहान मुले अतिशय आवडत असत . नेहरू यांचे कार्य उल्लेखनीय आहे. मुलांनी नियमितपणे वाचन करावे असे आव्हान श्री. उगले यांनी केले.सूत्रसंचालन मानसी वारुंगसे व अनुश्री कुंदे यांनी केले तर धनश्री माळी हिने आभार व्यक्त केले .यावेळी कार्यक्रमास विद्यालयातील सुनिल मांडवडे,शिवाजी गुरुळे,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे ,रोहिणी भगत आदींसह शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
