
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८५६ वा दिवस प्रत्येक राष्ट्राला एक ध्येय साकारायचे असते. एक विधिलिखित पूर्ण करायचे असते. भारताचे विधिलिखित म्हणजे एकात्म दर्शनावर आधारित एक आदर्श समाजरचना संपूर्ण विश्वाला द्यायची आहे. ज्यात परस्परसंबंधी, परस्परपूरक आणि परस्परावलंबी जीवनपद्धतीने लोकांचे दैनंदिन व्यवहार होतील. लोकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक कल्याणाची काळजी घेतली जाईल. हजारो वर्षांपासून भारत अशीच समाज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक आक्रमणे आणि वसाहतवाद्यांच्या हस्तक्षेपामुळे आम्ही त्या उद्दिष्टापर्यंत पोहचू शकलो नाही. म्हणून आपल्याला पुन्हा आपले राष्ट्र पुननिर्माणाचे कार्य करायचे आहे.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर ४ चैत्र शके १९४७*
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ मंगळवार दि. २५ मार्च २०२५ ★ १८८१ लोकमान्य टिळकांनी इंग्रजीतील संपादित केलेले ‘मराठा’ दैनिकाची सुरुवात.
★ १८८५ पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु
★ १९३२ सुप्रसिध्द मराठी साहित्यीक वसंत पुरुषोत्तम काळे ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्मदिन
.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
