
मारूती जाधव यांचेकडून इचल. येथील दे. भ. बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षणसंस्थेच्या नाईट काॅलेज ॴॅफ आर्टस् ॳॅन्ड काॅमर्सकडील सेवानिवृत्त प्रा. एम. एस. पवार वय वर्षे 64 यांचे रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी रात्री १०.४५ वाजता आजारपणामुळे निधन झाले. महाविद्यालयाचे अर्थशास्र विभाग प्रमुख म्हणून काम करीत असताना य. च. म. मु. वि. नाशिक अभ्यासकेंद्राचे सलग १८ वर्षे पूर्वतयारी, बी. ए., बी. काॅम अभ्यासक्रमाचे त्यांनी केंद्रसंयोजक म्हणून काम पाहिले. तर एकूण ३८ वर्षे त्यांनी अधिव्याख्याता म्हणून काम पाहिले. त्यांनी उर्दु , टेक्सटाईल आणि पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी योगदान दिले. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावरती काम करीत आहेत. अनेक अर्धवेळ आणि विनाअनुदानित हायस्कूल, काॅलेजवर काम करणार्या शिक्षकांना त्यांनी समंत्रक म्हणून काम देवून आर्थिक आधार दिला होता. शिस्तप्रिय आणि विद्यार्धीप्रिय असे शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थाकडून यथोचित गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या सेवा कार्यकाळात दे. भ. बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट काॅलेज अभ्यासकेंद्राला य. च. म. मु. वि.नाशिककडून आदर्श अभ्यासकेंद्राचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असून मुलगा अजिंक्य पवार बी.टेक. आणि मुलगी डॉक्टर आकांक्षा पवार बी. डी. एस. आहे. त्यांच्या निधनाबद्दल विद्यार्थी वर्गातून व शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
