
मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेस विनम्र अभिवादन करतांना उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण व शिक्षक वृंद
नांदगाव – मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने ‘बाल दिवस’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण व सर्व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. पंडित नेहरू यांना लहान मुलांबद्दल खूप प्रेम होते. ते मुलांना नेहमी देशाचे भविष्य मानत असत. त्यामुळे मुले त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणत असत. त्यांच्या या बाल-प्रेमामुळे सन १९६४ मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांचा वाढदिवस ‘बाल दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला.
हा दिवस मुलांच्या हक्कांबद्दल, शिक्षण आणि कल्याणाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. याप्रसंगी विद्यालयात मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी जगन्नाथ पाटील, उमेश पगार,अण्णासाहेब दुकळे, दत्तात्रय भिलोरे, अजित पगार,बाळासाहेब कवडे, प्रशांत पाटील, गजेंद्र माताडे,भाऊसाहेब सोनवणे, सुनील सुपेकर, योगेश खालकर, संदेश थोरात,नरेंद्र पाटील, वासुदेव कवडे,प्रणोद गोटे,राजेंद्र कदम, निलेश वाळके,गणेश ढोणे ,वाळू बागुल, निवृत्ती भरसट,कपिल पवार,अनिल जाधव,सुनिता निकम,स्मिता केदारे,मंगीता परदेशी, सुनंदा जाधव,जया गवळी,लता आहेर, अश्विनी खोकले,सरला बिडवे, कल्पना आहिरे, वैशाली पाटील, सायली पाटील,वैशाली खैरनार,उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.
