
ओझर: दि.१४ वार्ताहर
बलकवडे व्यायाम शाळा भगूर येथे जिल्हास्तरीय कुराश स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये ‘मविप्र’ समाजाचे माधवराव बोरस्ते विद्यालय ओझर येथील विद्यार्थीनींनी यश संपादन केले. त्यात कु वेदिका चौधरी कु भाग्यश्री जोंधळे या विद्यार्थिनी सतरा आतील गटात विजयी झाल्या. कु नेहा तौर ही मुलींमध्ये उपविजेता ठरली. चौदा आतील गटात मुलींमध्ये कु पायल पवार ही विजयी झाली तर कु अर्पिता खिची ही चौदा आतील मुलींमध्ये उपविजेता ठरली. या विद्यार्थिनींची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे सभापती बाळासाहेब क्षिरसागर उपाध्यक्ष विश्वासराव मोरे उपसभापती डी बी मोगल संचालक शिवाजी गडाख संचालिका शोभा बोरस्ते मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

