ओझर: दि.१४ वार्ताहर

येथील ‘मविप्र’ समाजाचे बोरस्ते विद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले. शिक्षक मंगल सावंत शितल हांडोरे हेमंत भट यांनी बाल दिनाविषयी माहिती दिली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. फलक लेखन सविता पवार मोनाली निकम यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन आठवी क च्या विद्यार्थिनींनी केले.
