
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०८९ वा दिवस
आपल्याला धड अर्धा मैल देखील चालता येत नाही आणि हनुमानाप्रमाणे समुद्र पार करण्याची आपण इच्छा बाळगीत आहोत. दिवसभर जगातील व्यवहार पाहायचे, कर्म करावयाचे आणि संध्याकाळी नाकाने तीन वेळा प्राणायाम करून ऋषी वा योगी बनू पहात आहोत, ते शक्य नाही. ही काही थट्टा आहे काय? हा सर्व निव्वळ मुर्खपणा आहे. आपल्याला आवश्यकता कशाची असेल तर ती चित्तशुद्धीची, हृदयाच्या पावित्र्याची. माणसे व पशु हे सर्व आपले आराध्य दैवत आहेत. आपण परस्परांचा मत्सर, कलह करण्याऐवजी त्या विराटची, आपल्या देशबांधवांची पूजा केली पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २३ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर २०२५
★ १७९४ क्रांतीकारक लहुजी राघोजी साळवे ऊर्फ लहुजी वस्ताद यांचा जन्मदिन.
★ १८८९ आधुनिक भारताचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन
★ १९६९ दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.
★ १९९३ स्वातंत्र्यसैनिक डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांच्या स्मृतिदिन
★ राष्ट्रीय बाल दिन.
★ जागतिक मधुमेह नियंत्रण दिन.
